
सावंतवाडी : नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडीतील नमिता सावंत यांनी समाजास महत्त्वाचा संदेश दिला आहे. महिलांमध्ये देवीचं रूप पाहण्याचं आवाहन करत, त्यांनी हातात फलक घेऊन जनजागृती केली असून हे खास लक्षवेधी ठरले.
स्त्रियांवर होणारे अत्याचार आणि अन्याय आजही समाजात सुरू आहेत. या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केले जात असल्याबद्दल चिंता व्यक्त करत नमिता सावंत हीने हा संदेश दिला. “भावांनो, उत्सव देवीचा आहे, सगळ्या महिलांमध्ये देवीच बघा...!” असा संदेश फलकावर लिहिला होता. नवरात्रीच्या काळात स्त्रीशक्तीचा सन्मान केला जातो. पण, रोजच्या आयुष्यात महिलांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. याच पार्श्वभूमीवर नमिताने देवीचं रूप धारण करून, राज्य सरकार मधील लाडक्या भावांना आणि संपूर्ण समाजाला स्त्रीयांचे रक्षण करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची विनंती केली आहे. या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे.