
कुडाळ : दशावतार नाट्य प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. सिंधुदुर्गचा राजा प्रतिष्ठान (कुडाळ) तर्फे बुधवार, 10 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी 6.00 वाजता 'वरुण देव गर्वहरण' या संयुक्त दशावतार नाट्य प्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे. अजीत गाडगीळ यांची कथा संकल्पना असलेल्या या प्रयोगात अनेक दिग्गज कलाकारांचा सहभाग असणार आहे.
सिंधुदुर्गचा राजा प्रतिष्ठान (कुडाळ) आयोजित करत असलेला हा दशावतार नाट्यप्रयोग सर्व नाट्यप्रेमींनी अवश्य अनुभवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.