
सावंतवाडी : ठाकरेंच्या शिवसेनेचे सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी आज उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांसह सकल हिंदू समाजाचे जिल्हाध्यक्ष व सकल मराठा समाजाचे जिल्हाध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार सीताराम गावडे यांच्या निवासस्थानी विराजमान असलेल्या 'गावंडेंचा राजा' विघ्नहर्ता चे मनोभावे दर्शन घेतले.
यावेळी सीताराम गावडे यांनी आपल्या अस्सल मालवणी शैलीत दणदणीत गाऱ्हाणं घातलं. यावेळी रुपेश राऊळ यांच्या समवेत नामदेव नाईक, अशोक धुरी, प्रशांत बुगडे, नेमळे उपसरपंच सखाराम राऊळ, सचिन मुळीक, सुभाष राऊळ, नितीन पांगम, वासुदेव राऊळ, प्रणय नाईक, राजेश भैरे आदी शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.