
सावंतवाडी : येथील सर्वोदयनगर परिसरात बंद घरात अज्ञात चोरट्याने चोरी करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार आज सकाळी उघडकीस आला. दरम्यान, घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे.
संबंधित घरातील कुटुंबीय हे गणेश चतुर्थी निमित्त चौकुळ येथे गेले होते. त्यामुळे ते घर बंद होते. मात्र, आज सकाळी घराचे कुलूप शेजाऱ्यांना तोडल्याचे आढळून आले. यावेळी त्यांनी पाहणी केली असता घराचा दरवाजा उघडा होता. त्यामुळे त्यांनी याबाबतची माहिती तात्काळ घर मालकाला देत पोलिसांना सुद्धा पाचारण केले. दरम्यान, या प्रकरणाचा अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे.