
सावंतवाडी : यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीच्या इंटिग्रेटेड डिप्लोमा फार्मसी विभागाने महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई आयोजित मानांकन प्रक्रियेत उत्कृष्ट कामगिरी करत 'व्हेरी गुड' हे मानांकन मिळविले आहे. या मानांकन प्रक्रियेत अध्यापनाची गुणवत्ता, प्रयोगशाळा व संशोधन सुविधा, विद्यार्थ्यांचे निकाल, प्राध्यापकांचे योगदान, ग्रंथालय, विद्यार्थी कल्याण योजना तसेच सामाजिक कार्य या सर्व बाबींचा विचार करण्यात आला.
विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच संशोधन, क्रीडा, सांस्कृतिक व सामाजिक कार्यात प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न कॉलेजकडून होत असतो. या प्रयत्नांचे फलित म्हणूनच 'व्हेरी गुड' मानांकन मिळाल्याचे प्राचार्य डॉ. विजय जगताप आणि विभाग प्रमुख प्रा.स्नेहा सावंत यांनी सांगितले. पुढील काळात संशोधन व नावीन्यपूर्ण उपक्रमांवर अधिक भर देण्यात येईल असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. या यशस्वी कामगिरीबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले, अध्यक्षा ऍड.अस्मिता सावंतभोसले, सचिव संजीव देसाई, प्रशासकीय अधिकारी सुनेत्रा फाटक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ले.कर्नल रत्नेश सिन्हा यांनी कॉलेजचे सर्व विद्यार्थी व शिक्षक वर्गाचे अभिनंदन केले.