
सावंतवाडी : भैरववाडी तरुण मित्रमंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या गणेश मखर सजावट आणि रांगोळी स्पर्धेचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. मखर सजावट स्पर्धेत तुषार एकनाथ साईल यांच्या ग्लोबल वॉर्मिंग संबधी देखाव्याने प्रथम पारितोषिक (रोख रक्कम ५५५५ रुपये आणि सन्मानचिन्ह) पटकावले आहे. तर राहुल रूपा सावंत यांच्या विठ्ठलमय देखाव्याने द्वितीय पारितोषिक (रोख रक्कम २,५५५ रुपये आणि सन्मानचिन्ह) आणि दीपक देवेंद्र साईल यांच्या रामसेतू देखाव्याने तृतीय पारितोषिक (रोख रक्कम १५५५ रुपये आणि सन्मानचिन्ह) पटकावले आहे.
केतन केशव साईल यांचा संत गोरा कुंभार देखावा, रोहन रवींद्र साईल यांचा वारली कला देखावा आणि जयेश सत्यवान सावंत यांचा पर्यावरण पूरक देखावा हे तिन्ही देखावे उत्तेजनार्थ पारितोषिकाचे मानकरी ठरले.रांगोळी स्पर्धेत रिया सत्यवान साईल हिने प्रथम क्रमांक (रोख रक्कम २,२२२ रुपये आणि सन्मानचिन्ह), भावना विश्राम साईल हिने द्वितीय क्रमांक (रोख रक्कम १,५५५ रुपये आणि सन्मानचिन्ह) तर निकिता / साक्षी साईल आणि दीप्ती गोसावी (संयुक्त) यांनी तृतीय क्रमांक (रोख रक्कम १००१ रुपये आणि सन्मानचिन्ह) पटकावला आहे. लता मोर्ये, श्रुष्टि भिवा साईल आणि सिद्धी संतोष साईल यांच्या रांगोळीने उत्तेजनार्थ पारितोषिके पटकावली आहेत. या दोन्ही स्पर्धांचे बक्षीस वितरण आज माजी प्राध्यापक आणि लेखक भाऊसाहेब गोसावी आणि ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी भाऊसाहेब गोसावी यांनी स्पर्धकांना मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी लिहिलेली काही पुस्तके विजेत्या स्पर्धकांना सुपूर्त केलीत. या स्पर्धांत सर्वच स्पर्धकांनी उत्तम कलाकृती सादर केल्या होत्या. त्यामुळे चुरस निर्माण झाली होती. मात्र स्पर्धेसाठी ठरविण्यात आलेल्या निकषानुसार परीक्षकांनी निष्पक्ष आणि सखोलपरीक्षण करून ही जबाबदारी लीलया पार पाडली. स्पर्धेसाठी माजी प्राध्यापक आणि लेखक भाऊसाहेब गोसावी, कलाप्रेमी जगन्नाथ सावंत, सौ. प्रियांका साईल (शिक्षिका), सौ. उज्वला तवटे आणि सौ. ज्योती भोसले (दोन्ही कला शिक्षक, मुंबई) आणि रांगोळी कलाकार सिद्धेश सुर्वे, सावंतवाडी यांनी परीक्षक म्हणून काम पहिले. या स्पर्धांसाठी भैरववाडी आणि आसपासच्या वाडीतील ग्रामस्थांनी पुढे येऊन सहकार्य केले. वासुदेव कांबळे, समीर सहदेव सावंत, सोनू बापू सावंत, स्वराज सुरज गोसावी, नारायण गोसावी, मंगेश साईल, अमित अर्जुन साईल, प्रथमेश कोरगावकर, रमेश गोसावी, सागर गोसावी, विनया साईल, दत्ताराम साईल, केतन साईल, प्रथमेश दळवी आणि श्याम साईल यांनी मोलाचे आर्थिक सहकार्य केले. त्यांचे, परीक्षकांचे तसेच या स्पर्धां यशस्वी करण्यासाठी ईतर सर्व प्रकारचे योगदान देणाऱ्या तरुण वर्गांचे आणि ग्रामस्थांचे आयोजकांनी आभार मानले आहेत.