
सावंतवाडी : भारत मातेच्या रक्षणासाठी सीमेवर लढणाऱ्या सैनिकांना बंधुत्वाच्या नात्याने येथील शहर महिला भाजपच्या वतीने १ हजार राख्यांची भेट पाठवण्यात आली. या राख्या येथील पोस्टाद्वारे पाठविण्यात आल्या आहेत.यावेळी शहराध्यक्षा मोहिनी मडगावकर, दिपाली भालेकर, मेघना साळगावकर, मिसबा शेख ,मेगा भोगटे, सविता टोपले, तृप्ती बिरोडकर आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.