स्‍मेहमेळावा थाटात...!

दै. कोकणसादचा वर्धापनदिन उत्साहात
Edited by:
Published on: July 22, 2025 20:39 PM
views 377  views

सावंतवाडी : ‘दै. कोकणसाद’चा ३६ वा वर्धापनदिन सोहळा थाटात रविवारी दि. २० जुलै रोजी संपन्‍न झाला. यावेळी कोकणसाद टीमच्‍या वतीने झाराप येथील हॉटेल आराध्‍य या ठिकाणी स्‍नेहमेळाव्‍याचे आयोजन करण्‍यात आले होते. 

तत्‍पूर्वी सकाळी श्री देव उपरलकर, श्री देव पाटेकर, श्री विठ्ठल मंदिर आणि श्री देव महापुरूषचे दर्शन घेऊन वर्धापनदिन सोहळ्याची सुरूवात करण्‍यात आली. यावेळी दै. कोकणसाद आणि कोकणसाद LIVE चे संपादक संदीप देसाई, चीफ रिपोर्टर कृष्‍णा ढोलम, मार्केटींग मॅनेजर समीर सावंत, स्‍वप्‍निल परब, जुईली पांगम, उपसंपादक रवींद्र जाधव, उपसंपादक लक्ष्‍मण आडाव, उपसंपादक भगवान शेलटे, मुख्‍यालय प्रतिनिधी लवू म्‍हाडेश्‍वर, वितरण प्रतिनिधी आश्‍पाक शेख, वेंगुर्ला प्रतिनिधी दीपेश परब, वैभववाडी प्रतिनिधी श्रीधर साळुंखे, दोडामार्ग प्रतिनिधी लवू परब,  कणकवली प्रतिनिधी स्‍वप्‍नील वरवडेकर, कुडाळ प्रतिनिधी निलेश वरसकर, देवगड प्रतिनिधी नागेश दुखंडे, अविनाश बांदेकर, मयुरेश राऊळ, आयटी हेड विद्देश धुरी, आयटी सहाय्‍यक मेघनाथ सारंग, अकाऊंटंट ओंकार नाईक, डिझायनर सर्वेश गावकर, कॅमेरामन साहिल बागवे, साहिल दहिबावकर, तन्‍वी आकेरकर उपस्‍थित होत्‍या. हॉटेल आराध्‍य येथे झालेल्‍या वर्धापनदिन सोहळ्यात दै. कोकणसादच्‍या आतापर्यंतच्‍या यशस्‍वी वाटचालीचा आढावा घेण्‍यात आला. 

यावेळी हॉटेल आराध्‍य येथे झालेल्‍या स्‍नेहमेळाव्‍यात प्रुडंट मीडियाचे संचालक ज्‍यो लुईस, संपादकीय संचालक  प्रमोद आचार्य, प्रुडंट नेटवर्कचे डिजिटल हेड रोहित वाडकर, प्रुडंट मीडियाचे संपादक सुयश गावणेकर,  डिजीएम रवींद्र पाटील,   वितरण प्रमुख सागर लाडे, भांगरभुईचे वृत्तसंपादक अमर गावकर, मार्केटिंग मॅनेजर केशव तळवडेकर.  यावेळी प्रुडंट मीडियाचे संचालक ज्‍यो लुईस यांनी डिजीटल मिडियातील क्रांतीबाबत मार्गदर्शन केले. शिवाय लवकरच ‘कोकणसाद LIVE’ कोकणसाद डिजिटल या नावाने लोकांसमोर येणार असल्‍याचे सांगितले. तसेच कोकणात रत्‍नागिरीतही दै. कोकणसाद आपला विस्‍तार करीत असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. प्रुडंट मीडियाचे असिस्टंट जनरल मॅनेजर किरण गोगटे, डिजिटल मीडियाबाबत माहिती दिली.