
सावंतवाडी : माठेवाडा येथील मयत प्रिया चव्हाण हिचे वडिल विलास तावडे यांची कलंबिस्त येथील निवासस्थानी भेट देऊन माजी खासदार विनायक राऊत यांनी धीर देत सोबत असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी वडिलांना न्याय नक्कीच मिळेल असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ, महिला आघाडी जिल्हाप्रमुख श्रेया परब, युवा सेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाठ, माजी जिल्हाप्रमुख रमेश गावकर, महिला आघाडी विधानसभा संघटक सुकन्या नरसुले, गुणाजी गावडे, पंकज शिरसाट ,सुनील गावडे, उमेश नाईक, अशोक धुरी आदी पदाधिकारी उपस्थित होते