सावंतवाडी लायन्स अध्यक्षपदी ॲड. अभिजीत पणदूरकर

Edited by:
Published on: July 19, 2025 12:46 PM
views 173  views

सावंतवाडी : लायन्स क्लबच्या अध्यक्षपदी ॲड. अभिजीत पणदुरकर तर सचिव पदी विजय चव्हाण व खजिनदारपदी प्रकाश राऊळ यांची निवड करण्यात आली. २० जुलैला सावंतवाडी लायन्स क्लबच्या नव्या पदाधिकारी आणि संचालकांचा शपथविधी होणार आहे, अशी माहिती मावळते अध्यक्ष अमेय पै यांनी दिली. 

सावंतवाडी लायन्स क्लबची 2025 -  26 नवी संचालक व कार्यकारणी निवडण्यात आली आहे. यात उपाध्यक्ष संदेश परब द्वितीय उपाध्यक्ष महेश पाटील, तृतीय उपाध्यक्ष जितेंद्र पंडित, सहसचिव योगेश टकेकर सहखजिनदार अनिता पाटील ट्वेल ट्विस्टर बाळासाहेब बोर्डेकर, टेमर  रोहित नाडकर्णी यांची ही निवड करण्यात आली आहे. लायन्स क्लबच्या विविध समित्यामध्ये स्वच्छ भारत- नीलम नाईक स्वाती पै, मेघना राऊळ, लायन क्वेस्ट अनुश्री पणदुरकर, सुजाता परब ,पीआरओ  - गजानन  नाईक, मेंबरशिप चेअरमन- गंगाराम पै जीएमटी -चेअरमन प्रसाद राऊत जी एस टी- चेअरमन महेश कोरगावकर, युथ प्रोग्रॅम - प्रतीक चोडणकर, निखिल पाटील रोहन परब, हेल्थ - डॉक्टर गोविंद जाधव श्लोका चोडणकर, स्वाती राऊत, 

ऍक्टिव्हिटी चेअरमन- रविकांत सावंत, राजन कुबडे, फंड रेझिंग- दया परब ,सुनील दळवी या संचालक मंडळाचा शपथविधी उपप्रांतपाल डॉ. किरण खोराटे यांच्या उपस्थितीत 20 जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता गोविंद चित्र मंदिर सावंतवाडी येथे पार पडणार आहे. या शपथविधी समारंभाला सर्व लायन्स परिवार आणि लायन्स प्रेमीनी उपस्थित राहावे असे आवाहन अमेय पै यांनी केले आहे.