
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचालित श्री पंचम खेमराज महाविद्यालया मध्ये संस्थेच्या माजी कार्याध्यक्षा व विश्वस्त राजमाता श्रीमंत सत्वशीलादेवी भोंसले यांची सातवी पुण्यतिथी साजरी करण्यात आली .त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष राजेसाहेब श्रीमंत खेमसावंत भोंसले ,चेअरमन राणीसाहेब सौ शुभदादेवी भोंसले, संस्थेचे कार्यकारी विश्वस्त युवराज लखमसावंत भोंसले, संस्थेचे कार्यकारीणी सदस्य जयप्रकाश सावंत ,डॉ. सतीश सावंत, संचालक प्रा. डी. टी. देसाई व सहसंचालक अॅड. शामराव सावंत, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एल. भारमल, श्री पंचम खेमराज लॉ कॉलेजचा प्राध्यापक वर्ग, मदर क्वीन्स इंग्लिश मीडियम स्कूलचा शिक्षक वृंद, कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकवर्ग व महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.