
सावंतवाडी : इन्सुली - माडभाकर परिसरात विमनस्क अवस्थेत फिरणाऱ्या बदलापूर येथील एकाला पोलिसांच्या साहाय्याने पणदूर येथील संविता आश्रमात दाखल करण्यात आले. सूर्या किसन मेस्त्री (वय ४२) असे त्याचे नाव असून तो गेले काही दिवस इन्सुली परिसरात फिरत होता.
याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलिस पाटील प्रिया कोठावळे, सामाजिक कार्यकर्ते हेमंत वागळे, हरीलाल सरोज यांनी त्यास प्राथमिक आरोग्य केंद्र बांदा येथे नेले. या ठिकाणी पायांवर झालेल्या जखमांचे उपचार करून संविता आश्रम पणदूर येथे त्यांना सोडण्यात आले.
यावेळी सविता आश्रमाचे संदीप परब उपस्थित होते. बांदा पोलिस तसेच क्षेत्रफळ पोलिस पाटील यांनी केलेल्या सहकार्याबद्दल हेमंत वागळे यांनी त्यांचे आभार मानले.