
कुडाळ : आगारातून कुडाळ ते केळुस बस वेळेत जात नसल्याने विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. कंट्रोलरूमला चौकशी केली की उद्धट उत्तरे मिळाल्याने विद्यार्थी व ग्रामस्थांनी कुडाळ आगारप्रमुख यांना घेराव घातला. यावेळी निलेश तेंडुलकर यांनी कुडाळआगारप्रमुख यांना धारेवर धरले,आगारातून वेळेवर गाडी नाही गेली तर विद्यार्थ्यांना जेवणाची व्यवस्था आगारप्रमुख यांनी करावी. आधी ठरलेली गाडी मग ती का बदलली ? आम्ही पाच सहा वेळा येऊन पण सोलूशन निघाले नाही. रोज बस उशिराने येतात १२:२० ची बस ०२:२० ला येते मग मुलांनी काय करायचे असा सवाल तेंडुलकर यांनी केला. आगारात चौकशी करण्यासाठी विद्यार्थी गेले असता ऑपरेटर त्यांना योग्य वागणूक देत नाही. उद्या कोणी ऑपरेटर ने कोणा विद्यार्थ्यांना उलट सुलट बोलला आणि त्यांच्यात काही झाले तर पोलिस केस आपण करायची नाही अशी सूचना निलेश तेंडूलकर यांनी दिली. अशा अनेक समस्या ग्रामस्थांनी मांडल्या. विद्यार्थ्यांना चांगली वागणूक मिळाली पाहिजे. ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा पाहताच आगारप्रमुख यांनी वाहक व चालक यांची कमतरता असल्याचं मान्य केले. या पुढे बस वेळेत येण्याचे आश्वासन ग्रामस्थांना आगारप्रमुख यांनी दिले. मात्र तोंडी नको लेखी द्या अशी मागणी ग्रामस्थांनी केली. परिस्थिती ची पडताळणी करत आगारप्रमुख यांनी लेखी आश्वासन देऊन गाडी या पुढे वेळेत जाईल असा मार्ग काढला जाईल. कुडाळ ते केळुस बस या पुढे १२:३० ला आगारातून मार्गस्थ होणार असे लेखी आश्वासन आगारप्रमुख यांनी उपस्थितांना दिले. यावेळी तेंडोली सरपंच अनघा तेंडोलकर
माड्याचीवाडी सरपंच विघ्नेश गावडे, आंदुर्ले सरपंच अक्षय तेंडोलकर, रामचंद्र राऊळ, तेंडोली माजी सरपंच मंगेश प्रभू,संदीप प्रभू, प्रताप राऊळ, सत्यवान तेंडोलकर, गजानन खानोलकर, सचिन तेंडोलकर, ग्रा. पं. सदस्य कवशल राऊळ व बाळू पारकर, शशिकांत तेंडोलकर, गजानन खानोलकर, राजन तेंडोलकर, विजय गोठोसकर, संदीप पेडणेकर, निलेश तेंडुलकर, विद्यार्थी इशान पावस्कर, चैतन्य पेडणेकर, दर्शन खानोलकर, अमरेश साळुंखे , आर्यन आरवकर, दिनेश कुंभार, नेहा नाईक आदी उपस्थित होते.