
सावंतवाडी : जिल्हा परिषद शाळा क्र. ४ मधील विद्यार्थ्यी वीरा घाडी शिष्यवृत्ती परीक्षेत शहरी विभागात जिल्ह्यात प्रथम आला. तसेच मानवी घाडी, पार्थ बोलके, हार्दिक वरक, काव्या तळवणेकर, स्वरा शेर्लेकर यांनी घवघवीत यश संपादन करत गुणवत्ता यादीत झळकले. अटल प्रतिष्ठानचे संस्थापक ॲड. नकुल पार्सेकर यांसह मान्यवरांच्या उपस्थितीत या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. यावेळी व्यासपीठावर केंद्रप्रमुख कमलाकर ठाकूर, मुख्याध्यापिका लक्ष्मी धारगळकर, शाळा समितीचे अध्यक्ष संतोष तळवणेकर, पत्रकार विनायक गांवस, ज्योती राऊळ, प्रशालेचे शिक्षक महेश पालव, शिक्षिका पूजा शिंदे, अन्वी धोंड, अंजना घाडी, वर्षा नाईक, शिल्पा जाधव, प्रणिती सावंत विद्यार्थी, पालक आदी उपस्थित होते.