नाटकात काम करण्याची सुवर्णसंधी..!

Edited by: विनायक गांवस
Published on: July 12, 2025 13:17 PM
views 66  views

सावंतवाडी : व्यावसायिक रंगभूमीवर आपल्या दर्जेदार नाटकांसाठी ओळखल्या जाणाऱ्या शिवगणेश प्रॉडक्शन्स (सिंधुदुर्ग मुंबई) लवकरच एक नवीन नाट्यकृती घेऊन येत आहे. या नाटकासाठी संस्थेला १० ते १२ वर्ष वयोगटातील एक मुलगा आणि एक मुलगी अशा बालकलाकारांची तसेच ३० ते ३५ वयोगटातील महिला कलाकाराची आवश्यकता आहे. शिवगणेश प्रॉडक्शन्सने यापूर्वी ‘ओशाळला मृत्यू’, ‘रायगडाला जेव्हा जाग येते’, ‘नरसिंह शिवराय’ आणि ‘ती फुलराणी’ यांसारख्या यशस्वी नाटकांची निर्मिती केली आहे.

आता ते एका नवीन विषयावर आधारित नाटक रंगभूमीवर सादर करणार आहेत. या नाटकासाठी कलाकारांची निवड प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे.या नाटकाचे प्रयोग मुंबई आणि पुणे येथे होणार आहेत. त्यामुळे इच्छुक कलाकारांना व्यावसायिक रंगभूमीवर काम करण्याची मोठी संधी मिळणार आहे. इच्छुक कलाकारांनी अधिक माहितीसाठी ९८२३५३७२९६ वर त्वरित संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.