
सावंतवाडी : युवा उद्योजक विशाल परब यांनी चराठा येथील श्री स्वामी समर्थ मंदिरांमध्ये गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला. चराठारोड येथील त्यांच्या निवासस्थानाजवळील वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिरात आयोजित कार्यक्रमात त्यांनी सपत्नीक श्री स्वामी समर्थांची पूजा केली.
या मंदिराला एक वर्ष पूर्ण झाले असून आज पार पडलेल्या गुरुपौर्णिमा उत्सवामध्ये त्यांच्या हस्ते श्री स्वामींची सिद्ध हस्तपूजा पार पडली. यावेळी त्यांच्या समवेत पत्नी सौ वेदिका मुलगा कु.विराज यांच्यासह जिल्हा परिषद माजी सदस्य सौ.आनंदी परब सामाजिक कार्यकर्ते रवींद्र परब तसेच माडखोल ओटवणे सावंतवाडी शहर व चराठा परिसरातील स्वामीभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चराठा येथील श्री स्वामी समर्थ मंदिरातही युवा नेते विशाल परब यांनी सपत्नीक पूजा केली. या पूजेसाठी आणि स्वामींच्या दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी झाली होती. मंदिर परिसर 'श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ'च्या जयघोषाने दुमदुमून गेला. पूजेनंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले. दिवसभर दोन्ही मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.