LIVE UPDATES

जि. प. शाळा नंबर ४ मध्ये वह्या वाटप

Edited by: विनायक गांवस
Published on: July 10, 2025 16:54 PM
views 86  views

सावंतवाडी : जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्राच्या माध्यमातून व संस्थापक, शिवसेना उपनेते निलेश सांबरे यांच्या संकल्पनेतूशिवसेना उपनेते निलेश सांबरे यांच्या संकल्पनेतून कोकणातील शालेय विद्यार्थ्यांना २५ लाख वह्यांचे वाटप करण्यात येणार आहे. गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून याचा शुभारंभ आज सावंतवाडी येथील जिल्हा परिषद शाळा क्र. ४ येथे करण्यात आला. अटल प्रतिष्ठानचे संस्थापक ॲड. नकुल पार्सेकर, स्पर्धा परीक्षा विभाग प्रमुख वाल्मिक बिलसोरे यांसह मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना या वह्याचे वाटप करण्यात आले. 

येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक ४ येथे हा उपक्रम जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. सावंतवाडी तालुक्यात २५ हजार वह्यांचे वाटप विद्यार्थ्यांना करण्यात येणार आहे. त्याचा शुभारंभ गुरूपौर्णिमेच औचित्य साधून करण्यात आला. अटल प्रतिष्ठानचे संस्थापक ॲड. नकुल पार्सेकर व स्पर्धा परीक्षा विभाग प्रमुख वाल्मिक बिलसोरे यांच्या हस्ते मुलांना वह्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर केंद्रप्रमुख कमलाकर ठाकूर, मुख्याध्यापिका लक्ष्मी धारगळकर, शाळा समितीचे अध्यक्ष संतोष तळवणेकर, पत्रकार विनायक गांवस, ज्योती राऊळ उपस्थित होते. 

याप्रसंगी ॲड. नकुल पार्सेकर म्हणाले, निलेश सांबरे यांच सामाजिक कार्य फार मोठं आहे. रत्नागिरी येथे अत्याधुनिक असं रूग्णालय उभारत निःशुल्क सेवा ते देत आहेत. विद्यार्थ्यांसाठी २५ लाख मोफत वह्या वाटपाच काम त्यांनी हाती घेतले आहे. यातील २५ हजार वह्यांच वाटप सावंतवाडीत करण्यात येत आहे. भविष्यात संस्थेच स्पर्धा परिक्षा केंद्र जिल्ह्यात सुरू करून अधिकारी निर्माण करण्यासाठी आपला प्रयत्न राहणार आहे असे मत व्यक्त केले. तर, संस्थेचे स्पर्धा परीक्षा विभाग प्रमुख श्री.बिलसोरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. जिजाऊ संस्थचेच्या माध्यमातून दरवर्षी वह्या वाटप व करिअर मार्गदर्शन केले जाते. आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण, शेती या क्षेत्रात संस्थेच कार्य आहे. आपण सर्वांनी स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करणं आवश्यक आहे. त्यासाठी शालेय स्तरावरच्या स्पर्धा परीक्षांत सहभाग घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेचे शिक्षक महेश पालव यांनी केले. तर आभार मुख्याध्यापिका लक्ष्मी धारगळकर यांनी मानले. याप्रसंगी शाळेच्या शिक्षिका पूजा शिंदे, अन्वी धोंड, अंजना घाडी, वर्षा नाईक, शिल्पा जाधव, प्रणिती सावंत विद्यार्थी, पालक उपस्थित होते.