
सावंतवाडी : प्रतीशिर्डी माडखोल येथील साईंची पालखी गुरूपौर्णिमेनिमित्त माजी मंत्री, आम. दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी दाखल झाली होती. केसरकर दांपत्याकडून पादुकांचे पुजन झाल्यानंतर आज सकाळी पायी चालत ही पालखी प्रती शिर्डी येथे दाखल झाली. आज पहाटे माखडोल येथील साई मंदीरात आम. दीपक केसरकर यांच्या हस्ते अभिषेक, महाआरती पार पडली. त्यानंतर
केसरकर यांच्या निवासस्थानाकडून वाजत गाजत पालखी माडखोलच्या दिशेने रवाना झाली. अभंग, भजनासह टाळ, मृदुंगाच्या निनादात साईभक्त तल्लीन होऊन गेले होते. याप्रसंगी शिवसेना शहरप्रमुख खेमराज उर्फ बाबू कुडतरकर, युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी, दत्ता सावंत, श्री. मालवणकर, सुधीर धुमे, सुजित कोरगावकर, आबा केसरकर, शैलैश मेस्त्री, विश्वास घाग, गजानन नाटेकर, अर्चित पोकळे, प्रविण चौगुले, पांडुरंग वर्दम यांसह साईभक्त मोठ्या संख्येने या पालखीत सहभागी झाले होते.