LIVE UPDATES

संदिप गावडेंच्या माध्यमातून मोफत वह्या वाटप

Edited by: विनायक गावंस
Published on: July 08, 2025 17:13 PM
views 29  views

सावंतवाडी : भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातुन माडखोल जिल्हापरिषद मतदारसंघात मोफत वह्या वाटप उपक्रम संदिप गावडे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आला. शालेय विद्यार्थ्यांनसाठी मोफत वह्या वाटप उपक्रम ते गेली अनेक वर्षे राबवित आहेत. 

यावर्षी देखील श्री. गावडे यांच्या माध्यमातून मोफत वह्या वाटप उपक्रम राबवण्यात आला. प्रथम आंबोली जिल्हापरिषद मतदार संघात वाह्यापटप पूर्ण करण्यात आले. आता संपूर्ण माडखोल जिल्हा परिषद मतदारसंघात हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांना शैक्षणिक दृष्ट्या सक्षम होणे फार महत्वाचे आहे. हाच उद्देश समोर ठेऊन मोफत वह्या वाटप उपक्रम दरवर्षी आम्ही राबवित असतो. स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यानी सहभाग घेऊन त्या दृष्टीने अभ्यास करावा अशी माझी इच्छा आहे. हेच डोळ्यासमोर ठेऊन यावर्षीची वाह्यांची थीम देखील आम्ही देशातील विविध महत्वाच्या स्पर्धा परीक्षा अशी ठेवलेली आहे. स्पर्धा परीक्षांसाठी प्रयत्न करणाऱ्या इच्छुक मुलांना देखील सहकार्य करण्यास मला आनंद होईल असे श्री गावडे म्हणाले. यावेळी माडखोल जिल्हापरिषद मतदार संघातील सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी सरपंच उपस्थित होते.