
सावंतवाडी : सावंतवाडी शहरात महावितरणच्या समस्या संपता संपत नाही आहेत. पाऊस नसताना बाहेर ऊन पडलेल असतानाही विद्युत पुरवठा दोन मिनिटे टिकत नाही आहे. यामुळे ग्राहकांची विद्यूत उपकरणे खराब होण्याची शक्यता आहे. उप कार्यकारी अभियंता फोन उचलत नसून वीज वितरणचे फोनही व्यस्त आहेत. मंत्री, आमदारांच्या बैठकांनंतरही या गलथान कारभारात बदल झालेला नाही. शून्य परिणाम दिसत असल्याने ग्राहकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत या समस्या संपणार कधी ? असा सवाल केला आहे. दरम्यान, बाजारपेठेतील लाईनमध्ये फॉल्ट असल्याची माहिती वीज वितरण कार्यालयाकडून दिली आहे. काल सोमवारी कामाचा दिवस असताना तसेच यापूर्वी काम केलेली असताना नेमका फॉल्ट कशात आहे ? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.