
सावंतवाडी : येथील अटल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ॲड. नकुल पार्सेकर यांनी नुकतीच 'पत्रकारिता व जन संज्ञापन' विषयाची पदविका उत्तम गुणांनी संपादन केल्याबद्दल त्यांचा थोर मराठी साहित्यिक जयवंत दळवी यांच्या आरवली येथील निवासस्थानी आजगावच्या साहित्य प्रेरणा कट्टा व शिरोडा येथील खटखटे वाचनालय यांनी संयुक्तरित्या आयोजित केलेल्या स्व. दळवी यांचे साहित्य चर्चा कार्यक्रमात हृदयी सत्कार करण्यात आला.
यावेळी स्व. दळवी यांचे पुतणे संदीप व सचिन दळवी, महाराष्ट्र शासनाचे सेवानिवृत्त माहिती अधिकारी सतीश पाटणकर, कोमसाप सावंतवाडी शाखेचे अध्यक्ष कवी दीपक पटेकर, साहित्य प्रेरणा कट्टाचे साहित्यिक विनय सौदागर, र. ग. खटखटे ग्रंथालयाचे कार्यवाह सचिन गावडे, व्हॉइस ऑफ मीडियाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रा. रूपेश पाटील तसेच साहित्य क्षेत्रातील मान्यवर लेखक, कवी व अन्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होतं.