'त्या' बिबट्याला पकडण्यासाठी सापळा

Edited by:
Published on: July 07, 2025 14:01 PM
views 280  views

सावंतवाडी : मळेवाड कोंडुरा - देऊळवाडी येथे  चार शेतकऱ्यांवर हल्ला करून त्यांना गंभीर जखमी करणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने तातडीने पाऊले उचललीत. वन विभागाच्या जलद कृती दलाकडून ग्रामस्थांच्या मदतीने परिसरात सापळा रचण्यात आला आहे.

हा बिबट्या परिसरातील बागायतींमध्ये लपून बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जवळच नदी असल्याने तो त्याच ठिकाणी आश्रय घेऊन राहण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे वन विभागाचे पथक त्या दिशेने कसून शोध घेत आहे. बिबट्याच्या हल्ल्यामुळे कोंडुरा-देऊळवाडी आणि आसपासच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभाग बिबट्याला लवकर जेरबंद करेल आणि नागरिकांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.