पालकमंत्र्यांची भूमिका जिल्ह्यासाठी फलदायी : प्रमोद कामत

Edited by: विनायक गावंस
Published on: July 06, 2025 20:57 PM
views 40  views

सावंतवाडी : शक्तिपीठ सिंधुदुर्गच्या टोकाला बांदा येथे जोडला जाणार होता. त्याचा जिल्ह्याला कोणताच फायदा नव्हता. पालकमंत्री नितेश राणे यांनी हा महामार्ग मळगाव किंवा झाराप येथे जोडण्यात यावा अशी भुमिका घेत प्रशासनाला सूचना दिल्यात. ही भुमिका जिल्ह्याच्या फलदायी असून त्यांच्या भूमिकेचं आम्ही समर्थन करतो असं मत माजी आरोग्य व शिक्षण सभापती प्रमोद कामत यांनी येथे दिली. बांदा येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

बांदा मंडल भारतीय जनता पार्टी, महामार्ग विरोधी शेतकरी कृती समिती व शेतकरी यांच्या वतीने ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी भाजपा महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, बांदा मंडल अध्यक्ष स्वागत नाटेकर, बांदा सरपंच प्रियांका नाईक, माजी अध्यक्ष महेश धुरी, सरचिटणीस मधुकर देसाई, जिल्हा उपाध्यक्ष जावेद खतीब,उमेश पेडणेकर, नेतार्डे उपसरपंच प्रशांत कामत, राजेश विरनोडकर, शेर्ले सरपंच प्रांजल जाधव, माजी उपसरपंच बाळू सावंत, ज्ञानेश्वर सावंत, उमेश पेडणेकर, उपसरपंच आबा धारगळकर, माजी सरपंच बाळा आकेरकर आदी उपस्थित होते.

 यावेळी बांदा सरपंच प्रियांका नाईक यांनी सुद्धा आभार व्यक्त केले. यावेळी वाफोली सरपंच उमेश शिरोडकर, नितीन राऊळ, इन्सुली सोसायटीचे चेअरमन दादा परब,माजी सरपंच दीपक सावंत, गुरु सावंत, रोणापाल माजी सरपंच सुरेश गावडे, साई पावसकर, संदीप बांदेकर,  गुरु कल्याणकर, वाफोली उपसरपंच विनेश गवस, राजा सावंत, दूध सोसायटी अध्यक्ष गजानन गायतोंडे, संदीप बांदेकर, शांताराम बंदिवाडेकर, नितीन सावंत, राजा सावंत, भाऊ वाळके, मयुर परब, निलेश कदम आदी सह पदाधिकारी उपस्थित होते.