
सावंतवाडी : कोंडुरा - देऊळवाडी येथे बिबट्याने चौघा शेतकऱ्यांवर हल्ला केल्याचा प्रकार घडला आहे. ही घटना आज सायंकाळी साडे चार वाजण्याच्या सुमारास घडली. यात ते गंभीर जखमी झाले आहेत. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाचे पथक घटनास्थळी रवाना झाले आहे. याबाबत सावंतवाडी वनविभागाचे वनक्षेत्रपाल सुहास पाटील यांनी दुजोरा दिला आहे.