
सावंतवाडी : तालुक्यातील मळगाव घाटात मोठे झाड रस्त्यावर कोसळल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला. या घटनेमुळे घाटातील दोन्ही बाजूंची वाहतूकीस अडथळा निर्माण झाला. यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. यामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला.मळगाव घाटातील एका वळणावर हे झाड कोसळले आहे. मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाड उन्मळून पडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. झाड रस्त्यावर आडवे पडले. झाड बाजूला करण्याच काम सुरू आहे.