सावंतवाडीत आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी

Edited by: विनायक गावंस
Published on: July 06, 2025 13:18 PM
views 100  views

सावंतवाडी : प्रतिपंढरपूर सावंतवाडीत आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. पहाटे काकड आरती, विठ्ठल-रखुमाईला दह्या, दुधाचं स्नान घालून सोहळ्यास प्रारंभ झाला. शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, सौ. संजना परब यांना श्रींच्या पुजेचा मान मिळाला. माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांची यावेळी विशेष उपस्थिती होती.दिवसभर विविध धार्मिक, आध्यात्मिक कार्यक्रमांची मांदीयाळी विठ्ठल मंदिरात होती. विठू नामात सावंतवाडी नगरी दुमदुमून गेली होती.

प्रतिपंढरपूर मानलं जाणाऱ्या सावंतवाडी विठ्ठल रखुमाई मंदिरात आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. आषाढी स्नान पुजेचा मान यंदा शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, सौ. संजना परब यांना प्राप्त झाला. कन्या वैष्णवी परब उपस्थित होती. पहाटे काकड आरतीनं उत्सवाला प्रारंभ झाला. त्यानंतर विठ्ठल-रखुमाईला दह्या, दुधाचा स्नान विधी पुरोहितांच्या मंत्रोच्चारात पार पडला. सकाळपासूनच विठ्ठलाच्या दर्शनासाठी भक्तांनी मोठी गर्दी मंदीरात केली होती. दुपारी अभंग, भक्तीगीत, भजनाचे कार्यक्रम झाले. दिवसभर विविध धार्मिक, आध्यात्मिक कार्यक्रमांची मांदीयाळी होती. विठू नामाच्या गजरात सावंतवाडी नगरी दुमदुमून गेली होती. सायंकाळी किर्तन सेवा व अभंग गायनाच आयोजन करण्यात आले.

यावेळी आम. दीपक केसरकर म्हणाले, विठ्ठलाचा आशीर्वाद सावंतवाडी शहरावर आहे. ३०० वर्ष या मंदिरास झालेली आहे. पंढरपूरला दर्शन घेऊन आज सावंतवाडीत उपस्थित राहीलो. अनेक लोक भक्तिभावाने येतात. भाऊ मसूरकर यांनी भक्तिमार्ग दाखवला. हाच वारसा पुढे घेऊन जात आहेत. विठ्ठलाचा नामजप केला जात आहे.