
सावंतवाडी : येथील डॉ परूळेकर नर्सिंग होम येथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल ग्रामस्थांना कै. दिनकर गंगाराम सामंत ट्रस्ट, मुंबई तर्फे प्रत्येकी दहा हजार रुपयांचे धनादेश डॉ. जयेंद्र परुळेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
क्षयरोगाने पिडित शेर्ले येथील प्रसाद राऊत,वेतोरे येथील बॅ नाथ पै नर्सिंग कॉलेज मधील ऋतुजा गावडे,देवसू येथील पोटाच्या गंभीर आजाराने पिडीत प्रियांका गुरव,पेंडूर येथील विद्यार्थी अविनाश गावडे, विलवडे येथील डोळ्यांच्या विकाराने ग्रस्त विनायक सावंत, इन्सुली येथील कर्करोग ग्रस्त कृष्णा कुडव,पेंडुर येथील नर्सिंग शिक्षण घेणारी पुजा राऊत, सावंतवाडी येथील संधीवाताने ग्रस्त ललिता निगुडकर,पेंडुर येथील मधुमेह आजाराने पिडीत अनिल गावडे,निगुडे येथील डोळ्यांच्या आजाराने पिडीत सुहासिनी निगुडकर,ओटवणे येथील रक्तदाबाने ग्रस्त रुक्मिणी गावकर, ओटवणे येथील दृष्टीहीन झालेले राजेश मुळीक, सावंतवाडी येथील होतकरू विद्यार्थी पांडुरंग नमशी अशा तेरा व्यक्तींना हे धनादेश प्रदान करण्यात आले आहेत.