
सावंतवाडी : सिंधुदुर्गचे सुपुत्र तथा डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीचे वनस्पती शास्त्रज्ञ डॉ. रमेश कुणकेरकर यांची पदोन्नती झाली असून कृषी महाविद्यालय दापोली येथे पदोन्नती मिळाली आहे.
डॉक्टर कुणकेरकर हे मूळ कुणकेरी तालुका सावंतवाडी येथील मूळ रहिवासी असून कुणकेरी पूर्ण प्राथमिक शाळेत शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्यांनी वेंगुर्ले येथील वस्तीगृहात राहून बारावीपर्यंतचे आपले शिक्षण पूर्ण केले होते. त्यानंतर घरची परिस्थिती अत्यंत बिकट असतानाही दापोली येथील कृषी विद्यापीठात प्रवेश घेतला होता. तेथेच त्यांनी अत्यंत जिद्दीने, कष्टाने पदवीतर शिक्षण घेऊन आपली सेवा कोकण कृषी विद्यापीठातच सुरू ठेवली होती. एका बाजूला नोकरी आणि दुसऱ्या बाजूला संशोधन करीत त्यांनी या पदावर आपले मोहर उठवली असून एक शांत, संयमी, व अभ्यासू व्यक्तिमत्व असा त्याने लौकिक प्राप्त केला आहे. त्यांच्या या नियुक्तीचे फुले आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे. त्याने आपल्या पदाचा पदभार एक जुलै रोजी कृषी दिनी स्वीकारला आहे.