कार्यकर्त्यांनी संघटना वाढीवर भर द्यावा

मंत्री नितेश राणे यांचं आवाहन
Edited by: विनायक गांवस
Published on: July 05, 2025 18:16 PM
views 199  views

सावंतवाडी : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शहरात व ग्रामीण भागात संघटना वाढीवर भर द्यावा असे आवाहन राज्याचे मत्स्य व बंदर मंत्री नितेश राणे यांनी आज येथे केले. सावंतवाडी येथील शहर भाजप कार्यालयात मंत्री राणे यांनी आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेट घेत पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी भाजप जिल्हा चिटणीस महेश सारंग यांनी पुष्पगुच्छ देऊन मंत्री श्री राणे यांचे स्वागत केले. यावेळी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.