
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी ' पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी सुनील राऊळ तर उपाध्यक्षपदी नंदकिशोर वडगावकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. फेडरेशनची पंचवार्षिक निवडणूक अध्यासी अधिकारी तथा सहाय्यक निबंधक सावंतवाडी सुजय कदम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी निवड करण्यात आली. फेडरेशनच्या कार्याध्यक्ष पदी जॉय डॉन्टस व उपाध्यक्षपदी सूनिल नाईक यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेठी नुतन संचालक बाबुराव कविटकर, समिर वंजारी,सुभाष चौधरी, विष्णु पराडकर उपस्थित होते. नुतन अध्यक्ष सुनिल राऊळ यांनी पतसंस्था फेडरेशन हे सहकारी पतसंस्थासाठी काळाची गरज असून फेडरेशनच्या माध्यमातून " पतसंस्थांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. तसेच पतसंस्थाच्या वसुलीबाबत वेगवेगळया स्थरावर मार्गदर्शन करणार असल्याचे सांगितले.पतसंस्था ह्या सर्वसामान्यांच्या आर्थिक गरजा " पूर्ण करुन ' सर्वसामान्यांना उभारी देण्याचे कार्य करत आहेत. त्यामुळे ही पतसंस्था चळवळ सक्षमपणे चालविण्यासाठी फेडरेशनचे प्रयत्न राहतील. तसेच याकामी जिल्हयातील सर्व पतसस्थांचे सहकार्य अपेक्षित असून जिल्हयातील पतसंस्थांना प्रत्यक्ष संपर्क करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यासाठी पतसंस्थांच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष'व सचिव यांच्यासाठी मार्गदर्शन शिबिरे आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगिलते, यासाठी जिल्हयातील सर्व पतसंस्थांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.