
सावंतवाडी : मुंबई गोवा महामार्गावरील सावंतवाडी मळगाव येथील ब्रिज साईड रोडची अवस्था अत्यंत भयावह झाली आहे. रस्ता पूर्णतः उखडून पडला असून अपघात होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग नक्की करतो काय असा सवाल प्रवासी करत आहे
या रस्त्यावर प्रवाशांची प्रचंड वर्दळ असते. अशा परिस्थितीत रस्त्याची झालेली अवस्था हे कोणत्याही क्षणी अपघाताला निमंत्रणच आहे याबाबत स्थानिक रहिवासी व प्रवाशांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग नक्की काय करतोय ? असा सवाल त्यांनी केला आहे. कोणाचा जीव गेला की प्रशासन, सरकारला जाग येणार का अशी संतप्त भावना प्रवासी व्यक्त करत आहेत.