आ. केसरकरांच्या सुचनेनंतर सावंतवाडीतील महावितरणची यंत्रणा जागी

Edited by: विनायक गांवस
Published on: June 30, 2025 19:11 PM
views 156  views

सावंतवाडी : माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांच्या सुचनानंतर सावंतवाडीतील महावितरणची यंत्रणा खडबडून जागी झाली. शहरात वीज वाहिन्यांना अडथळा निर्माण करणाऱ्या झाडांच्या फांद्या खास कटरच्या साहाय्याने हटवण्याचे काम आज हाती घेण्यात आले.  या कामासाठी शहराचा वीजपुरवठा दिवसभर खंडित ठेवण्यात आला होता. 

गेल्या काही दिवसांपासून सावंतवाडी शहर विजेच्या समस्येने त्रस्त होते. झाडे आणि फांद्या वीज वाहिन्यांना अडकत असल्याने वीजपुरवठा वारंवार खंडित होत होता. अपघाताचा धोकाही वाढला होता. या पार्श्वभूमीवर आमदार दीपक केसरकर यांनी महावितरण अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली होती. त्यानंतर ही मोहीम हाती घेण्यात आली. सकाळी सुरू झालेले हे काम दिवसभर सुरू होते. त्यामुळे शहराचा वीजपुरवठा सायंकाळ पर्यंत पूर्णपणे बंद होता.