
सावंतवाडी : जेष्ठ नेते, विकास सावंत यांच्या 62 व्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी येथील राणी पार्वती देवी शाळेच्या नवरंग सभागृहात 21 वर्षाखालील मुलांसाठी घेण्यात आलेल्या बुद्धिबळ स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी उत्सवमूर्ती विकास सावंत आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली.
उदयोजक आणि युवा नेतृत्व विक्रांत सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली भाईसाहेब सावंत प्रतिष्ठान आणि मुक्ताई ॲकेडमीने स्पर्धेचे आयोजन केले. यावेळी विकास सावंत यांनी स्पर्धेचे महत्त्व सांगताना पराभव झालेल्या मुलांनी खचून न जाता पुन्हा भरारी घेऊन यश मिळवण्याचा सल्ला दिला. यापुढे देखील विविध स्पर्धा, उपक्रम आयोजित केले जातील, असे ते म्हणाले. यावेळी विकासभाईंच्या हस्ते राष्ट्रीय बुदधिबळ खेळाडू बाळकृष्ण पेडणेकर आणि राष्ट्रीय कॅरम खेळाडू कु.साक्षी रामदुरकर यांचा सन्मान चिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी अमोल सावंत, बाळासाहेब नंदीहळ्ळी, किरण सावंत, श्री.प्रवीण सावंत, कौस्तुभ पेडणेकर, इत्यादी मान्यवर उपस्थित होते. बाळकृष्ण पेडणेकर याने स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. विजेत्यांना रोख रक्कम, चषक आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन मिनानाथ वारंग यांनी केले. यात प्रथम बाळकृष्ण पेडणेकर,द्वितीय दुर्वांक सातार्डेकर,तृतीय यथार्थ डांगी,चौथा पार्थ गावकर,पाचवा हर्ष राऊळ. पंधरा वर्षाखालील मुले - प्रथम विभव राऊळ, द्वितीय पुष्कर केळूसकर,तृतीय विराज दळवी, पंधरा वर्षाखालील मुली -
प्रथम गार्गी सावंत
द्वितीय साक्षी रामदुरकर
तृतीय सलोनी चव्हाण
दहा वर्षाखालील मुले -
प्रथम अन्वय सापळे
द्वितीय विघ्नेश अंबापूरकर
तृतीय अवनिश सावंत
सर्वोत्कृष्ट बाल खेळाडू मुलगा
दक्ष वालावलकर
सर्वोत्कृष्ट बाल खेळाडू मुलगी
आस्था लिंगवत यांनी मान मिळवला.