सावंतवाडीत सांजावचा उत्साह

Edited by: विनायक गांवस
Published on: June 24, 2025 21:47 PM
views 134  views

सावंतवाडी : तालुक्यात सांजाव सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ख्रिस्ती बांधवांसाठी हा सण आनंदाची पर्वणीच असतो.संत जॉन बाप्तिस्त यांचा जन्मदिवस 'सांजाव' म्हणून साजरा केला जातो. तालुक्यातील ख्रिस्ती बांधवांनी सांजाव सण मोठ्या उत्साहात साजरा केला.

बायबलमधील कथेनुसार जिजसच्या जन्माची बातमी ऐकल्यानंतर आपल्या आईच्या पोटात असलेल्या जॉन बाप्तिस्त यांनी आनंदाने उडी मारली होती. त्यामुळे विहिरीत उडी घेऊन आनंदोत्सव साजरा करण्याचा प्रघात ख्रिस्ती धर्मात आहे. धो-धो पावसामध्ये डोक्यावर रंगीत फुलांचे मुकुट घालून हातामध्ये माडाचे पिडे व वाद्यांच गजर करीत ख्रिस्ती बांधव या दिवशी गटागटाने फिरत असतात. मौजमस्ती करीत कोकणी गाणी, कातारा गात, घुमट वाजवत सर्वजण आनंदाने नाचतात. तालुक्यात ख्रिस्ती बांधवांनी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला.