सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील सी.टी.स्कॅन मशीनची दुरुस्ती

Edited by: विनायक गांवस
Published on: June 24, 2025 11:57 AM
views 78  views

सावंतवाडी : उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथील सी.टी.स्कॅन मशीन दुरुस्ती करण्यात आल असून काल रात्री 11 पासून ही सेवा रुग्णांच्या सेवेत  पूर्ववत करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांनी दिली. 

उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथील रुग्णांच्या सेवेत असलेल्या सी.टी.स्कॅन मशीनचा पार्ट खराब झाल्यामुळे दोन दिवसापासून  सी.टी.स्कॅन सेवा बंद होती. वारंवार लाईट ये जा करत असल्यामुळे सी.टी.स्कॅन मशीनचा पार्ट गेल्याची  माहिती येथील सी.टी.स्कॅन ऑपरेटर यांनी दिली होती. परंतु, काल रात्री नऊ वाजता मशीनची दुरुस्ती झाल्याने रात्री 11 पासून सी.टी.स्कॅन मशीन रुग्णांच्या सेवेसाठी पूर्ववत करण्यात आल्याची माहिती येथील सी.टी.स्कॅन डिपार्टमेंट मॅनेजर प्रथमेश परब यांनी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे व रुग्ण कल्याण नियामक समितीचे सदस्य रवी जाधव यांना दिली आहे.