
सावंतवाडी : राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी या ठिकाणी रुग्णांना फळं वाटप करण्यात आली. तसेच विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. सावंतवाडी तालुका भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त उपजिल्हा रुग्णालयात फळं वाटप करण्यात आली. तसेच विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. यावेळी भाजपचे जिल्हा चिटणीस, जिल्हा बँक संचालक महेश सारंग, डॉ. सावंत, जिल्हा बँक संचालक रविंद्र मडगावकर, शहराध्यक्ष सुधीर आडिवरेकर, पंकज पेडणेकर, तालुका मंडल अध्यक्ष संतोष राऊळ, माजी नगरसेवक राजू बेग, मनोज नाईक, आनंद नेवगी, दिपाली भालेकर, प्राजक्ता केळुसकर, अँड. संजू शिरोडकर, दिलिप भालेकर, चंद्रकांत कदम, गणेशप्रसाद पेडणेकर, सुकन्या टोपले, मेघना साळगावकर आदींसह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.