
सावंतवाडी : तत्व पाळणारे माझे वडील होते. तेच संस्कार माझ्यावर झालेत. आजवर प्रेम करणारी अनेक माणसं मला भेटत गेली. ज्या पक्षानं माझ्या घराण्याला नावलौकिक दिला तो पक्ष मी कधी सोडला नाही असे प्रतिपादन ज्येष्ठ कॉग्रेस नेते विकास सावंत यांनी व्यक्त केले. तसेच थोरामोठ्यांच्या सानिध्यात मला राहता आलं हे माझं भाग्य समजतो. समाजासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहावं हीच माझी इच्छा आहे, अशा भावना श्री. सावंत यांनी व्यक्त केल्या. ६२ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी कृतज्ञता व्यक्त करताना ते बोलत होते.
शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ कॉग्रेस नेते विकास सावंत यांचा ६२ वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. राणी पार्वती देवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे हा अभिष्टचिंतन सोहळा संपन्न झाला. प्रारंभी ६२ व्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. ६२ वृक्षांचे वाटप यावेळी करण्यात आले. तसेच विद्यार्थी गणवेश वाटप, १० वी, १२ वी गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव अध्यक्ष विकास सावंत यांच्या हस्ते या करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष अँड. दिलीप नार्वेकर, उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर, कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, सचिव व्ही.बी.नाईक, खजिनदार सी.एल. नाईक, नामदार भाईसाहेब सावंत प्रतिष्ठानचे कार्यकारी संचालक विक्रांत सावंत, अमोल सावंत आदी उपस्थित होते.
सावंत पुढे म्हणाले, शैक्षणिक क्षेत्रात आमच्या प्रशालांनी १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. यासाठी विद्यार्थी, शिक्षकांची मेहनत महत्वाची आहे. या परंपरेमुळे माझं सर्वत्र कौतुक होतं. माझ्या प्रशालांचा मला त्यासाठी अभिमान वाटतो. सामाजिक क्षेत्रात वावरताना माझ्यावर सभोवतालच्या लोकांकडून संस्कार घडले, यातूनच मी घडत गेलो. सामान्यतील सामान्य व्यक्तीकडून मी बरंच काही शिकलो. वाढदिवस मी कधी साजरे केले नाहीत. आज माझ्या सहकाऱ्यांनी हा सोहळा आयोजित केला. यानिमित्ताने शुभेच्छा देणाऱ्या सर्वांचेच मी आज ऋण व्यक्त करतो.
अभिष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. कॉग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख शुभेच्छा देताना म्हणाले, विकास सावंत हे आमचे प्रेरणास्थान आहेत. ते एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व असून त्यांना दिर्घायुष्य लाभो अशा सदिच्छा व्यक्त केल्या. संस्थेचे सचिव व्ही. बी. नाईक म्हणाले, आमच्या शैक्षणिक संस्थांचे कुटुंबप्रमुख विकासभाई आहेत. प्रसिद्धीपेक्षा कामाला महत्व देणारं हे व्यक्तिमत्त्व आहे. शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी वैभव निर्माण केलं आहे. तर विक्रांत सावंत म्हणाले, शिस्त आणि विचार जपणारे विकासभाई आहेत. स्व.भाईसाहेब सावंत यांचा विचार जपण्याचं काम त्यांनी केलं. आजकाल राजकारणात हाती दगड दिले जातात. मात्र, माझा वडीलांनी लेखणी हाती दिली, अनेकांना रोजगार दिला अशा भावना व्यक्त करत त्यांना दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना केली. दरम्यान, माजी नगराध्यक्ष अँड. दिलीप नार्वेकर यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. नार्वेकर व सावंत कुटुंबांचा १०० हून अधिक वर्षांचा स्नेह आहे. स्व.बाप्पा नार्वेकर व भाईसाहेब सावंत यांचे घरोब्याचे संबंध होते. विकास सावंत यांचा अभ्यास दांडगा आहे. संस्थात्मक कार्यात नेहमीच त्यांचे मार्गदर्शन आम्हाला लाभते. त्यांना दीर्घायुष्य लाभो हीच पाटेकर चरणी प्रार्थना अशा शुभेच्छा श्री. नार्वेकर यांनी दिल्या.
याप्रसंगी संप्रवी कशाळीकर, वसुधा मुळीक, अँड. नकुल पार्सेकर आदींनीही मनोगत व्यक्त करत शुभेच्छा दिल्या.यावेळी गुरु नाईक, वसुधा मुळीक, सोनाली सावंत, छाया सावंत, संप्रवी कशाळीकर,बाळासाहेब नंदीहळ्ळी, नारायण देवरकर, अँड. सुभाष पणदूरकर, अँड. शामराव सावंत, राजेंद्र म्हापसेकर,संजय कानसे, चंद्रकांत सावंत, जगदीश धोंड, के.टी.परब, विभावरी सुकी, कबीर सावंत, धिरेंद्र होळीकर, प्रल्हाद सावंत, काका मांजरेकर, अँड. नकुल पार्सेकर, श्री बोडके, अस्मिता ठाकूर, सौ. दळवी, सिद्धेश परब, बाळासाहेब पाटील, संजय गवस, प्रा. एल.पी. पाटील, एस पी नाईक, डॉ. दीपक तुपकर आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपप्राचार्य डॉ सुमेधा नाईक यांनी तर आभार पर्यवेक्षक श्री. पाटील यांनी मानले.