LIVE UPDATES

कोलगाव इथं भीषण अपघात

दुचाकीस्वार गंभीर जखमी
Edited by: विनायक गांवस
Published on: June 16, 2025 20:18 PM
views 1134  views

सावंतवाडी : सावंतवाडी  - कुडाळ मार्गावरील कोलगाव येथे एका भीषण अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. टेम्पो (क्रमांक एमएच०७-पी-३५८२ ) च्या चालकाने रस्त्याच्या स्थितीकडे दुर्लक्ष करून हयगयीने वाहन चालविल्याने हा अपघात घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. टेम्पो क्रमांक ८एमएच०७-पी-३५८२ ) वरील चालक प्रकाश शंकर दळवी (वय ७५, रा. भटवाडी, सावंतवाडी) हे सावंतवाडीहून कुडाळकडे जात होते. कोलगाव येथे कुडाळहून चराठेकडे जाणाऱ्या होंडा मोटारसायकल क्रमांक एमएच०७-एव्ही-४७०२ ला त्यांनी डाव्या बाजूने जोरदार धडक दिली.या अपघातात मोटारसायकल चालक अमित भरत जाधव (वय ३५, व्यवसाय नोकरी, रा. कुडाळ विठ्ठलवाडी, स्वस्तिक अपार्टमेंट, ता. कुडाळ) यांना गंभीर व किरकोळ दुखापती झाल्या आहेत. तसेच, दोन्ही वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

या प्रकरणी, चालक प्रकाश शंकर दळवी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस हवालदार अनिल धुरी करत आहेत. या अपघातामुळे सावंतवाडी-कुडाळ मार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.