
कणकवली : मत्स्य व्यवसाय व बंदरे विकासमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवार २३ रोजी सकाळी १०.३० वा. खारेपाटण हायस्कूल येथे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात मुंबईतील डॉक्टर, अथायु हॉस्पिटल केअर सेंटरचे डॉक्टर, विवेकानंद नेत्र रुग्णालयचे डॉक्टर व खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्र येथील डॉक्टर आणि खारेपाटण डॉक्टर क्लबचे डॉक्टर उपस्थित राहून रुग्णांची तपासणी करणार आहेत. डोळ्याची तपासणी व मधुमेह, रक्तदाब तपासणी, रक्ताच्या विविध तपासण्या करण्यात येणार आहेत. याशिवाय किशोरवयीन मुलींना मासिक पाळी विषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहेत. महिलांच्या स्तनाचे कॅन्सर व गर्भ पिशवीचे कॅन्सर तपासण्या करण्यात येणार आहेत. मुतखडा, प्रोस्टेट ग्रंथींचे आजार, लघवीचे आजार, हाडांचे विकार यांच्या तपासण्यात व त्याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तरी या शिबिराचा खारेपाटण दशक्रोशीतील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन रमाकांत राऊत यांनी केले आहे.