मनसेच्या शिरगांव जनसंपर्क कार्यालयाचं संदीप दळवींच्या हस्ते उद्घाटन

Edited by: नागेश दुखंडे
Published on: June 16, 2025 11:58 AM
views 132  views

देवगड : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या देवगड तालुक्यातील शिरगांव जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन संदीप दळवी यांच्या हस्ते रविवारी संपन्न  झाले.  या जनसंपर्क कार्यालयाच्या उ‌द्घाट सोहळ्यास जिल्हा संपर्कप्रमुख संतो शिंगाडे, देवगड तालुका संपर्क अध्यक्ष नितीन पवार, जिल्हाध्यक्ष धीरज परव अनिल केसरकर, उपजिल्हाध्यक्ष गणेः वाईरकर, चंदन मेत्री, देवगड तालुकाध्यक्ष संतोष मयेकर ,कुणाल किनळेकर, जिल्हासचिव सचिन तावहे देवगड सहसंपर्क अध्यक्ष सुरेंद्र गावडे तालुकाध्यक्ष रुपेश पांगम, वैभववाड तालुकाध्यक्ष महेश कदम, शाखाध्यक्ष राजन पवार, भाई पांगम, सुनील गुरु आदी मान्यवरांसह पदाधिकार्र मनसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना मनसेचे सरचिटणीस संदीप दळवी म्हणाले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला न्याय मिळेल. मनसैनिक तळागाळातील सर्वसामान्यांची कामे मार्गी लागण्यासाठी प्रयत्नशील राहतील. जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रत्येक मनसैनिकासोबत पदाधिकारी नेते मंडळी खांद्याला खांदा लावून सहकार्य करतील याची हमी देतो असही दळवी म्हणाले.

 यावेळी १० वी १२ परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. सरचिटणीस गजानन राणे म्हणाले, यापूर्वी कार्यकर्ते पदाधिकारी चौकात नाक्यावर किंवा मिळेल त्याठिकाणी उभे राहून जनतेचे प्रश्न सोडवत असत. आता त्यांना हक्काचे जनसंपर्क कार्यालय लाभले आहे. सर्वसामान्यांना मनसे ज्या पद्धतीने तत्काळ न्याय मिळवून देते तशा प्रकारे कोणतीच संघटना न्याय मिळवून देत नाही. हीच मनसेची खरी ताकद आहे. मनसे पदाधिकारी जनतेच्या सेवेची कामे करत आहेत. त्यांना इतरांनी नाहक त्रास देऊन नये. त्रास देणाऱ्यांना मनसे स्टाइलने उत्तर दिले जाईल.