शिबिरास उस्फूर्त प्रतिसाद

३० हून अधिक रक्तदात्यांचे रक्तदान
Edited by:
Published on: June 15, 2025 18:26 PM
views 84  views

सावंतवाडी : 'जागतिक रक्तदाता दिना'चे औचित्य साधून 'ऑनकॉल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्ग', 'सावंतवाडी तालुका पत्रकार संघ' आणि 'रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी' यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडी येथे एका भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ३० हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान करत आपली सामाजिक बांधिलकी जपली.

येथील रोटरी क्लब ऑफ सावंतवाडीच्या सभागृहात हे रक्तदान शिबीर उत्साहात पार पडले. या शिबिरास मोठा प्रतिसाद लाभला. एसएसपीएम कॉलेज पडवे टीमच्या माध्यमातून हे शिबीर यशस्वीरीत्या आयोजित करण्यात आले होते.

या शिबिरात रक्तदान करणाऱ्यांमध्ये सुमीत मालवणकर, रूपेश कुडतरकर, कैलास परब, मनिष राऊळ, सागर येरम, श्रेयस राऊळ, विष्णू राऊळ, लूमा जाधव, सखाराम नाईक, विठ्ठल राऊळ, ओंकार जाधव, राजेश पेडणेकर, महेंद्र पालव, निलेश मुळीक, दत्तात्रय पंडीत, केशव शिंदे, वासुदेव हळदणकर, दीपक मुंज, श्रीया माणगावकर, श्रेया निंबाळकर, राहूल सावंत, निलेश लातये, सुयोग राऊळ, प्रसाद सावंत, सिद्धी दिवेकर, अमोल गोवेकर, सचिन रेडकर, सुधाकर रेडकर यांचा समावेश होता.

रक्तदात्यांना आयोजक संस्थांच्या वतीने प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. यावेळी ऑनकॉल रक्तदाते संस्थेचे अध्यक्ष दयानंद गवस, रोटरी क्लब ऑफ सावंतवाडीचे अध्यक्ष रो. प्रमोद भागवत, नॅब असोसिएशनचे अध्यक्ष अनंत उचगावकर, सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन रेडकर, कोमसाप शाखा सावंतवाडी अध्यक्ष दीपक पटेकर, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष अमोल टेमकर, ऑनकॉलचे सचिव बाबली गवंडे, खजिनदार सिद्धार्थ पराडकर, पत्रकार संघाचे सचिव विजय राऊत, खजिनदार रामचंद्र कुडाळकर, सहसचिव विनायक गांवस आणि रक्तपेढी तंत्रज्ञ (एसएसपीएम) मनीष यादव आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. या यशस्वी आयोजनामुळे रक्तदान चळवळीला सावंतवाडी तालुक्यात मोठा हातभार लागला आहे.