घे भरारी कडून वृक्षारोपण

Edited by: विनायक गांवस
Published on: June 15, 2025 17:37 PM
views 28  views

सावंतवाडी : नुकताच घे भरारी फाउंडेशन सावंतवाडी यांच्यावतीने पोलीस स्टेशन सावंतवाडी येथे पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी वृक्षारोपण करून वृक्षसंवर्धनाचा संदेश दिला .

घे भरारी फाउंडेशन सावंतवाडी यांच्यावतीने नेहमीच उत्तमोत्तम समाज उपयोगी आणि समाज प्रबोधनात्मक असे कार्यक्रम , विविध उपक्रम आयोजित केले जातात. त्यातून सामाजिक संदेश दिला जातो. याच उद्देशाने सावंतवाडी पोलीस स्टेशन येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न करून प्रत्येकाने एक झाड जरूर लावावे आणि ते  जोपासावे असा संदेश दिला. यावेळी घे भरारी फाउंडेशनच्या फाउंडरमेंबर मोहिनी मडगावकर , अध्यक्षा रेखा कुमठेकर , कार्याध्यक्षा मेघना राऊळ, उपाध्यक्षा संध्या पवार, सेक्रेटरी सलोनी वंजारी , खजिनदार स्वप्नाली कारेकर, ज्योती दुधवडकर शारदा गुरव सुष्मिता नाईक, , सीमा रेडीज , अरुणा नाईक, शरदिनी बागवे , सरिता फडणीस, गीता लोहार ,  मेघा भोगटे इत्यादी उपस्थित होत्या. या कार्यक्रमासाठी  पोलीस पुंडलिक सावंत, महिला पोलीस प्राजक्ता कदम, श्रीम. मुळीक आणि पोलीस स्टेशनचे इतर सर्व कर्मचारी उपस्थित होते. घे भरारीच्या अध्यक्षा रेखा कुमठेकर यांनी सर्व पोलीस स्टेशन कर्मचाऱ्यांचे आणि पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांचे सहकार्याबद्दल विशेष आभार व्यक्त केले.