
सावंतवाडी : सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनचे खजिनदार ,ज्येष्ठ तज्ञ प्रशिक्षक तथा माजी कबड्डीपट्टू मार्टिन आल्मेडा यांची 18 वर्षाखालील पहिल्या राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेकरिता निवड समिती सदस्य म्हणून राज्य कबड्डी संघटने कडून नियुक्ती करण्यात आली आहे.
ही स्पर्धा दि 14 ते 18 जून या कालावधीत पुणे बालेवाडी येथे राज्य संघटनेच्यावतीने आयोजित करण्यात आलेली आहे. मार्टिन अल्मेडा हे कॅथलिक बँकेचे सेक्रेटरी असून ते सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनच्या वतीने गेली पंचवीस वर्षे कबड्डी प्रशिक्षक म्हणून जिल्ह्यात कार्यरत आहेत. त्यांनी हॉली क्रॉस मंडळाची स्थापना करून मुला मुलींचे संघ तयार केले आहेत. सतत मैदानात उपस्थित राहून खेळाडूना प्रशिक्षित करणे हा त्यांचा छंद आहे. आजपर्यंत अनेक राज्य व राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडविले आहेत. त्यापैकी अनेक खेळाडू आज पोलीस दल,सैन्य दल,कंपन्या तसेच अनेक शासकीय कार्यालयात काम करत आहेत. कोकण रेल्वेच्या कबड्डी संघाचे त्यांनी प्रशिक्षक पद सुद्धा भुषविलेले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक वर्षे निवड समिती सदस्य म्हणून काम करत असताना राज्यस्तरावर सुद्धा त्यांनी निवड समितीवर उत्कृष्ट काम केलेले आहे. त्यांच्या या योगदानाचा विचार करून मार्टिन आल्मेडा
यांना राज्यस्तरावर निवड समिती सदस्य म्हणून निवड करण्यात आलेली आहे . त्यांच्या ह्या निवडी बद्दल सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनच्यावतीने व खेळाडूंच्यावतीने कार्यवाह दिनेश चव्हाण यांनी अभिनंदन केले. तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनचे अध्यक्ष रुजारीओ पिंटो, उपाध्यक्ष ॲड. अजित गोगटे , दिलीप रावराणे , तुषार साळगावकर , कार्याध्यक्ष संजय पेडणेकर व अन्य पदाधिकाऱ्यांनी , पंच व कार्यकर्त्यांनी मार्टीन आल्मेडा यांचे अभिनंदन केले आहे .