LIVE UPDATES

मध्यम प्रकल्प विभागीय पथकाच्या कार्यकारी अभियंतापदी गोविंद श्रीमंगले

Edited by: विनायक गांवस
Published on: June 14, 2025 11:24 AM
views 76  views

सावंतवाडी : मध्यम प्रकल्प विभागीय पथकाच्या कार्यकारी अभियंता पदाचा कार्यभारगोविंद हनुमंतराव श्रीमंगले यांनी स्वीकारला आहे. प्रकल्प विभागीय पथक, आंबडपाल या विभागाच्या कार्यकारी अभियंता पदाचा अतिरीक्त कार्यभार आज शुक्रवार रोजी स्वीकारला आहे. मध्यम प्रकल्प विभागीय पथकाचे कार्यकारी अभियंता हर्षद ग. यादव यांची बदली  टेंभू उपसा प्रकल्प विभागीय पथक सांगली येथे झाली आहे.

गोविंद श्रीमंगले हे गेले तीन  वर्षे सिंधुदुर्ग पाटबंधारे विभाग, आंबडपाल, कुडाळ येथे कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत आहेत. आपल्या कार्यकाळामध्ये त्यांनी या विभागांतर्गत येणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 23 लघु पाटबंधारे प्रकल्प व ४ केटीवेअरचे सिंचन व्यवस्थापन अतिशय चांगल्या प्रकारे हाताळले आहे.  मध्यम प्रकल्प  विभागीय पथकाच्या अंतर्गत अरुणा प्रकल्प व देवघर प्रकल्प येत असून या प्रकल्पांच्या कालव्यांची कामे चालू आहेत. सिंचन व्यवस्थापनाचा व या जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थितीचा अनुभव कार्यकारी अभियंता श्रीमंगले यांना असल्यामुळे ते यशस्वीपणे ही जबाबदारी स्वीकारतील.