एक झाड मातृभूमीसाठी

Edited by: विनायक गांवस
Published on: June 09, 2025 14:45 PM
views 148  views

सावंतवाडी : राष्ट्रीय पातळीवर राबविण्यात येणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या पर्यावरण दिना निमित्ताने "एक झाड मातृभूमीसाठी" या कार्यक्रमाच्या माध्यमातून संदिप गावडे यांच्या आयोजनातून रविवारी "फ्लॉवर व्हॅली ऍट कावळेसाद पॉईंट'' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमा अंतर्गत गेळे, येथे कवळेसाद पॉइंट तसेच तेथे जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा सुमारे १०० झाडे लावण्यात आली. भारतीय जनता पार्टीचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी भाजपच्या महिला अध्यक्षा श्वेता कोरगावकर, माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे, रविंद्र मडगावकर, आंबोली सरपंच सावित्री पालेकर, गेळे सरपंच सागर ढोकरे, माजी नगरसेवक मनोज नाईक आदींसह पर्यावरण प्रेमी, सामाजिक कार्यकर्ते, भारतीत्य जनता पार्टीचे सावंतवाडी तालुक्यातील कार्यकर्ते, आंबोली, गेळे, चौकुळ येथील ग्रामस्थ उपस्थित होते.