
सावंतवाडी : शहरात दिवसेंदिवस वाहतूक कोंडीची समस्या वाढत आहे. बाजारपेठेसह मोती तलाव काठावरही ही समस्या उद्भवली आहे. पार्किंग व्यवस्था नसल्याने ट्राफिक जामची डोकेदुखी सावंतवाडीकरांना सतावत आहे.
नगरपरिषद प्रशासनाला कोणी वाली उरला नाही. लोकप्रतिनिधी नसल्याने सध्या प्रशासकीय राजवट आहे. त्यात मुख्याधिकारी यांची नुकतीच बदली झाली. त्यामुळे वाहतूक कोंडीच नियोजन होतं नाही. त्यात शहरात मोठमोठ्या इमारती उभ्या राहत असून पार्किंगची सोय तेथे नाही. त्यामुळे रसत्याचा आसरा वाहनधारकांना घ्यावा लागत आहे. बाजारपेठेत येणाऱ्या लोकांकडून न.प. समोर, मोती तलाव काठी वाहन लावली जात आहेत. रस्त्याच्या दूतर्फा हे पार्किंग होत असल्यानं मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. वाहतूक पोलिसांची मात्र यात चांगलीच तारांबळ उडताना दिसत आहे.