
सावंतवाडी : निसर्ग संवर्धन जाणीव जागृती करत देशी फळ झाडांचे बिजरोपण करण्याच्या उद्देशाने रविवारी १५ जून रोजी सकाळी साडे सात ते साडे नऊ या वेळेत नरेंद्र डोंगर येथे बिजारोपण अभियानाचे आयोजन केले आहे.
अभिनव फाऊंडेशन सिंधुदुर्ग व भारतीय किसान संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या अभियानात पर्यावरण प्रेमी, शालेय विद्यार्थी, सामाजिक संस्था, संघटना, नागरिकांनी आणि सामाजिक कार्यकर्ते या सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे. कोणत्याही फळ झाड्याच्या बिया येतांना घेऊन येण्याच्या आहेत. ज्यांना प्रत्यक्ष येणे शक्य नाही त्यांनी आपल्याकडील फळ झाडांच्या बिया आदिनारायण मंगल कार्यालय नजिक संजय स्टोअर्स येथील राजू केळुस्कर (7083974400) यांच्या कडे द्याव्यात किंवा अभय भिडे (9420733942)यांच्याशी संपर्क साधावा. रविवारी सकाळी मारुती मंदिर येथे जमून या अभियानाची सुरुवात होणार आहे.