भ्रष्टाचारासंबंधी तक्रारीचा पाठपुरावा

अज्ञाताकडून धमकी
Edited by: विनायक गांवस
Published on: June 08, 2025 16:29 PM
views 681  views

सावंतवाडी : भ्रष्टाचार संबंधी तक्रारीच्या पाठपुराव्याबाबत ग्रामपंचायत तेरवण-मेढे यांचे कार्यालयाशी पत्रव्यवहार चालू असताना एका अज्ञात व्यक्तीने फोन करून धमकी दिल्याची तक्रार माहिती अधिकार महासंघ महाराष्ट्र राज्य संपर्क संघटक तालुका प्रमुखाने दाखल केली आहे. या तक्रारीनुसार सावंतवाडी पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

या दिलेल्या तक्रारीत तक्रारदार तहसिलदार कार्यालय सावंतवाडी येथे येथे आपल्या कामसाठी असताना अज्ञात व्यक्तीने फोन करून तुम्ही कुठे असाल तेथे येवून तुमचे काय ते बघतो अशी धमकी देत शिवीगाळ केल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. भ्रष्टाचार संबंधी तक्रारीच्या पाठपुराव्याबाबत ग्रामपंचायत तेरवण-मेढे यांचे कार्यालयाशी पत्रव्यवहार चालू असताना येथून ही धमकी दिल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे. यानुसार सावंतवाडी पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे.