
सावंतवाडी : नगरपरिषद बॅ.नाथ पै सभागृहाच्या स्वच्छतागृहात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. नाथ पै सभागृह, शेजारी दवाखाना व दस्तुरखुद्द आरोग्य विभागाच कार्यालय असताना प्रशासन करतय काय ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
या ठिकाणच्या दवाखान्यात येणाऱ्या रुग्णांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. नियमित साफसफाई होत नसल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे असे येथील व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यात इंदीरा गांधी व्यापारी संकुलातील स्वच्छतागृह बंद असल्याने याच स्वच्छतागृहाचा वापर होत आहे. नियमित साफसफाई केली जात नसल्याने परिसरात दुर्गंधीचे वातावरण आहे. अशाच परिस्थिती नागरिकांना नाक मुठीत धरून प्रसाधनगृह वापरावे लागत आहे. न.प. दवाखाना आणि आरोग्य विभागाच्या नाकासमोर हा प्रकार घडत आहे. त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.