
सावंतवाडी : शहरातील प्रसिद्ध व्यावसायिक राजेंद्र उर्फ राजन शांताराम वाळके (वय ७२) यांचे अल्पशा आजाराने दुःख निधन झाले. आज सकाळी राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बाजारपेठेतील लता लॉज, वाळके टॉवरचे ते मालक होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, दोन सूना, नात, पुतणे, बहीणी असा मोठा परिवार आहे. राहुल वाळके, रूपेश वाळके यांचे ते वडील होत. येथील उपरलकर स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.